मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१२

                                                           जन्म - गुण कुंडली... - भाग

प्रस्तावना : ज्योतिष शास्त्र आणि कविता करणे अशा दोनही गोष्टींची आवड असल्याने , असे मनात आले कि दोन्ही गोष्टींना एकत्र आणावे. म्हणून हा एक वेगळा प्रयत्न...
आणि दुसरे म्हणजे खालील कविता हि कदाचित प्रत्येक आईने आपल्या बाळासाठी म्हटलेले आशीर्वच शब्द असतील.
त्यासाठीच हि सुगंधित आशीर्वच फुले अर्पण...

ग्रह तारे तर लाभो तुजला
तयांसवे हि गुण कुंडली || धृ. ||
नक्षत्र वाटिका बहरू दे तुझीयादारी
तयांसाठी हि जन्म कुंडली || धृ. ||
आरोग्य अन व्यक्तिमत्व लाभो तुजला
वसते जे ते प्रथम स्थानी || १ ||  
धनसंपदा अन मधुर वाणी मिळो तुजला
वास्तव्य जयांचे द्वितीयस्थानी || २ ||    
पराक्रम, यश, कीर्ती लाभो तुजला
वास्तव्य असे तृतीय स्थानी || ३ ||
मातृत्व जन्मू दे तुझियाठायी
लाभूनी चतुर्थस्थानी || ४ ||
गंध उमलू दे तुझिया श्वासात
फुलती जे पंचम स्थानी || ५ ||
शत्रुत्व न घडो कदापि
असते जे षष्ठस्थानी || ६ ||
साथ मिळो प्राणसख्याची
वास्तव्य ज्याचे सप्तमस्थानी || ७ ||
दीर्घायुष्य लाभो तुजला
दिसून येते अष्टमस्थानी || ८ ||
भाग्य उजळू दे तुझीयाठायी
लाभूनी नवमस्थानी || ९ ||
पितृत्व घडो सदा
वास्तव्य जयाचे दशमस्थानी || १० ||
मित्रत्व मिळो तुजला
लाभते जे एकादशस्थानी || ११ ||
इच्छापुर्तीत्वे मिळू दे मोक्ष
वास्तव्य ज्याचे द्वादश स्थानी || १२ ||
देई पूर्णत्व तुजला
ईशतत्व जे तुझीयाठायी || धृ. ||
आशीर्वच मम हा मातेचा
तव सौख्याची देई ग्वाही || धृ. ||

                                                             ------- स्मिता.