नाते आमचे.....
नाते आमचे..कधी रक्ताचे
कधी मैत्रीचे
नाते आमचे..कधी
बहिणीचे
कधी
मैत्रिणीचे
नाते आमचे..कधी
बंधनांचे
कधी
स्पंदनांचे
नाते आमचे..कधी
हक्काचे
कधी कर्तव्याचे
नाते
आमचे..कधी
घडविण्याचे
कधी
भावनांमधून
सोडविण्याचे
नाते
आमचे..कधी आशीर्वच
शब्दांचे
कधी
मनातल्या
सुरांचे
नाते
आमचे..कधी शब्दांचा अर्थ
सांगणारे
कधी
अर्थामागील भावना
जपणारे
नाते
आमचे..असावे
जन्मोजन्मीचे
कधीच न
तुटणारे...
