कुठलीही गोष्ट शास्त्रोक्त पद्धतीने करायला मला अतिशय आवडते.... त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली ते मोरगाव च्या :मयुरेश्वर पासून.
श्री मोरेश्वर -
मोरगाव : ता पुरंदर , पुण्याहून ६५ कि मी
मूर्ती - स्वयंभू, मखरात बसवलेली वर नागफणा. डाव्या सोंडेची. सिंदुरचर्चित .
मंदिर - उत्तराभिमुख , दीपमाला , तटबंदी मंदिरा जवळ थोड्या अंतरावर कर्हा वाहते...मंदिरापुढे चौथर्यावर नंदी आणि दगडी उंदीर. उत्तराभिमुख चार कोपर्यात चार खांब.
इतिहास : मोरया गोसावी यांचे जन्मस्थान आणि गाणपत्य संप्रदायाचे आध्यपीठ. अष्टविनायकांच्या गणनेत अग्रस्थान. इथे कर्हा नदीत मोरया गोसावी यांना गणेशमूर्ती मिळाली आणि ती घेऊन ते चिंचवडला आले.
श्री सिद्धिविनायक -
सिद्धटेक : ता कर्जत , पुण्याहून ९९ कि मी
मूर्ती - स्वयंभू, उजव्या सोंडेची, भीमा नदीच्या तीरावर सुरेख घाट
इतिहास - शंकरांच्या सांगण्या वरून श्री विष्णूने ओमकाराची तपश्चर्या केली आणि सिद्धी प्राप्त झाल्यामुळे सिद्धिविनायक असे नाव दिले गेले.
श्री बल्लाळेश्वर -
पाली : ता सुधागड , जिल्हा रायगड, पुण्याहून ११२ कि मी
मूर्ती - स्वयंभू, पूर्वाभिमुख , तीन फुट उंचीची. डाव्या सोंडेची, जरा रूंदट, कपाळाचा भाग काहीसा खोलगट,
मंदिर - श्रीकारी धाटणीचे . बांधकाम चिरेबंदी जणू भुईकोट किल्ला. पूर्वाभिमुख, दिशासाधन आहे ..मागच्या बाजूला स्वयंभू ढून्ढी विनायकाचे मंदिर.
इतिहास - बल्लाळाच्या भक्तीने प्रस्सन्न होवून गणपतीने आपले स्थान प्रकट केले..म्हणून बल्लाळेश्वर असे नाव पडले...
श्री वरद विनायक :
महड : ता खालापूर जिल्हा रायगड, पुण्याहून ८१ कि मी
मूर्ती - दगडी सिंहासनावर दोन हत्ती कोरलेले, डाव्या सोंडेची, मंदिरात १८९२ पासून अखंड नंदादीप तेवत आहे.. पूर्वाभिमुख...
इतिहास -देवळाच्या मागे एक तळे आहे..त्या तळ्यात १६९० साली पौन्डकर नावाच्या गणेश भक्ताला हि गणेश मूर्ती तळ्यात सापडली..
श्री चिंतामणी :
थेऊर - ता हवेली जिल्हा पुणे, पुण्याहून २४ कि मी
मूर्ती - महाद्वार उत्तराभिमुख, मूर्ती पूर्वाभिमुख..तिन्ही बाजूंनी मुळा-मुठेचा वेढा.
इतिहास - चिंता हरतो मनातली तो चिंतामणी...ब्रह्म देवांना ओम्काराने जेंव्हा अष्टसिद्धी प्राप्त झाल्यावर दर्शन दिले तेंवा त्याच्या कंठी चिंतामणी रत्नहार होता...त्यावरून चिंतामणी असे नाव देण्यात आले..
श्री गिरिजात्मज :
लेण्याद्री डोंगर , ता जुन्नर जिल्हा पुणे , पुण्याहून ९८ कि मी..
मूर्ती - ओबड- धोबड ,पूर्ण मुख दर्शन न होणारी...त्यामुळे पाठीची पूजा केली जाते.
मंदिर व इतिहास -
इतिहास - श्री महादेव हे देवांचे देव असूनही हिमालयावर कुणाची तपश्चर्या करत हा प्रश्न पार्वतीला पडला, तेंव्हा महादेव म्हणाले कि विष्णू, ब्रम्हा, वरुण, चंद्र , सूर्य या सर्वांना प्रेरणा देणारा ॐकार आहे सकल देवांचा आद्यदेव..पार्वतीला ओंकाराने आपल्या पोटी जन्म घ्यावा असे वाटू लागले. लेण्याद्री पर्वतावर तिने बाळाच्या मूर्तीची उपासना करण्यास सुरुवात केली . अखंड तप केल्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मूर्तीतून एक सुंदर बाळ जन्माला आले ....तिथेच नंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. तो गिरिजात्मज..
गिरीजा म्हणजे पार्वती आणि तिचा आत्मज तोच हा गिरिजात्मज.
श्री विघ्नेश्वर -
ओझर : ता जुन्नर, जिल्हा पुणे , पुण्याहून ८४ कि मी
मूर्ती - स्वयंभू, डाव्या सोंडेची, आसनमांडी घालून बसलेली पूर्णाकृती पूर्वाभिमुख, दोन्ही बाजूला रिद्धी - सिद्धी..
मंदिर व इतिहास - अष्टविनायकमधील समजला जाणारा सर्वात श्रीमंत गणपती..
श्री महागणपती -
रांजणगाव : ता शिरूर, जिल्हा पुणे, पुण्याहून ५२ कि मी.
मूर्ती- मंदिरात भोगमूर्ती . रिद्धी -सिद्धी समवेत मूळ मूर्ती तळघरात दडवलेली आहे.महागणपती हा ८, १०, १२ भुजांचा असतो, मूळ मूर्तीला १० सोंड,२० हात आहेत.
पुर्वाभूमुख असल्याने मूर्तीवर सूर्यकिरण येतात.