गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१२

त्वमानंदमयस्तवं ब्रम्हमय: - तुज नमो....


आज २६ जानेवारी २०१२, माघ शुक्ल चतुर्थी श्री गणेश जयंती , आम्ही नुकतीच २७_२८ डिसेंबर ला पूर्ण केलेली अष्टविनायक यात्रा , आणि आता तासांपूर्वी श्रीमंत दगडू हलवाई मंदिरात पार पडलेला गणेश जन्म सोहळाआणि मला श्री गणेशाचा पाळणा हलविण्यासाठी मिळालेला मान ......त्यामुळे माझी स्वारी एकदम खुश होती ....
अशा सगळ्या गोष्टींचा योग एकदम जुळून आला म्हणून मी ब्लॉग  चा शुभारंभ करूया असा विचार केला. ..
कुठलीही गोष्ट शास्त्रोक्त पद्धतीने करायला मला अतिशय आवडते....
त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली ते मोरगाव च्या :मयुरेश्वर पासून.
 श्री मोरेश्वर -
मोरगाव : ता पुरंदर , पुण्याहून ६५ कि मी
मूर्ती - स्वयंभू, मखरात बसवलेली वर नागफणा. डाव्या सोंडेची. सिंदुरचर्चित .
मंदिर - उत्तराभिमुख , दीपमाला , तटबंदी मंदिरा जवळ थोड्या अंतरावर कर्हा वाहते...मंदिरापुढे चौथर्यावर नंदी आणि दगडी उंदीर. उत्तराभिमुख चार कोपर्यात चार खांब.
इतिहास : मोरया गोसावी यांचे जन्मस्थान आणि गाणपत्य संप्रदायाचे आध्यपीठ. अष्टविनायकांच्या गणनेत अग्रस्थान. इथे कर्हा नदीत मोरया गोसावी यांना गणेशमूर्ती मिळाली आणि ती घेऊन ते चिंचवडला आले.
श्री सिद्धिविनायक -
सिद्धटेक : ता कर्जत , पुण्याहून ९९ कि मी
मूर्ती - स्वयंभू, उजव्या सोंडेची, भीमा नदीच्या तीरावर सुरेख घाट
इतिहास - शंकरांच्या सांगण्या वरून श्री विष्णूने ओमकाराची तपश्चर्या केली आणि सिद्धी प्राप्त झाल्यामुळे सिद्धिविनायक असे नाव दिले गेले.
श्री बल्लाळेश्वर -
पाली : ता सुधागड , जिल्हा रायगड, पुण्याहून ११२ कि मी
मूर्ती - स्वयंभू, पूर्वाभिमुख , तीन फुट उंचीची. डाव्या सोंडेची, जरा रूंदट, कपाळाचा भाग काहीसा खोलगट,
मंदिर - श्रीकारी धाटणीचे . बांधकाम चिरेबंदी जणू भुईकोट किल्ला. पूर्वाभिमुख, दिशासाधन आहे ..मागच्या बाजूला स्वयंभू ढून्ढी विनायकाचे मंदिर.
इतिहास - बल्लाळाच्या भक्तीने प्रस्सन्न होवून गणपतीने आपले स्थान प्रकट केले..म्हणून बल्लाळेश्वर असे नाव पडले...
श्री वरद विनायक :
महड : ता खालापूर जिल्हा रायगड, पुण्याहून ८१ कि मी
मूर्ती - दगडी सिंहासनावर दोन हत्ती कोरलेले, डाव्या सोंडेची, मंदिरात १८९२ पासून अखंड नंदादीप तेवत आहे.. पूर्वाभिमुख...
इतिहास -देवळाच्या मागे एक तळे आहे..त्या तळ्यात १६९० साली पौन्डकर नावाच्या गणेश भक्ताला हि गणेश मूर्ती तळ्यात सापडली..
श्री चिंतामणी :
थेऊर - ता हवेली जिल्हा पुणे, पुण्याहून २४ कि मी
मूर्ती - महाद्वार उत्तराभिमुख, मूर्ती पूर्वाभिमुख..तिन्ही बाजूंनी मुळा-मुठेचा वेढा.
इतिहास - चिंता हरतो मनातली तो चिंतामणी...ब्रह्म देवांना ओम्काराने जेंव्हा अष्टसिद्धी प्राप्त झाल्यावर दर्शन दिले तेंवा त्याच्या कंठी चिंतामणी रत्नहार होता...त्यावरून चिंतामणी असे नाव देण्यात आले..
श्री गिरिजात्मज :
लेण्याद्री डोंगर , ता जुन्नर जिल्हा पुणे , पुण्याहून ९८ कि मी..
मूर्ती - ओबड- धोबड ,पूर्ण मुख दर्शन न होणारी...त्यामुळे पाठीची पूजा केली जाते.
मंदिर व इतिहास -
इतिहास - श्री महादेव हे देवांचे देव असूनही हिमालयावर कुणाची तपश्चर्या करत हा प्रश्न पार्वतीला पडला, तेंव्हा महादेव म्हणाले कि विष्णू, ब्रम्हा, वरुण, चंद्र , सूर्य या सर्वांना प्रेरणा देणारा ॐकार आहे सकल देवांचा आद्यदेव..पार्वतीला ओंकाराने आपल्या पोटी जन्म घ्यावा असे वाटू लागले. लेण्याद्री पर्वतावर तिने बाळाच्या मूर्तीची उपासना करण्यास सुरुवात केली . अखंड तप केल्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मूर्तीतून एक सुंदर बाळ जन्माला आले ....तिथेच नंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. तो गिरिजात्मज..
गिरीजा म्हणजे पार्वती आणि तिचा आत्मज तोच हा गिरिजात्मज.
श्री विघ्नेश्वर -
ओझर : ता जुन्नर, जिल्हा पुणे , पुण्याहून ८४ कि मी
मूर्ती - स्वयंभू, डाव्या सोंडेची, आसनमांडी घालून बसलेली पूर्णाकृती पूर्वाभिमुख, दोन्ही बाजूला रिद्धी - सिद्धी..
मंदिर व इतिहास - अष्टविनायकमधील समजला जाणारा सर्वात श्रीमंत गणपती..
श्री महागणपती -
रांजणगाव : ता शिरूर, जिल्हा पुणे, पुण्याहून ५२ कि मी.
मूर्ती- मंदिरात भोगमूर्ती . रिद्धी -सिद्धी समवेत मूळ मूर्ती तळघरात दडवलेली आहे.महागणपती हा ८, १०, १२ भुजांचा असतो, मूळ मूर्तीला १० सोंड,२० हात आहेत.
पुर्वाभूमुख असल्याने मूर्तीवर सूर्यकिरण येतात.



पाली च्या डोंगराजवळून    जेंव्हा गाडी जाते, तेंव्हा त्या डोंगराकडे नीट बघितल्यावर असे लक्षात येते कि , त्या डोंगराचा आकार आणि पालीच्या गणपतीची मूर्ती हे दोन्ही अगदी सारखे आहे..म्हणजे साक्षात गणपती त्या डोंगराच्या रूपाने दर्शन देतो...आणि हे आपर्यंत कुठल्याही पुस्तकात नमूद केले गेलेले नाही..आतापर्यंत दोन-तीन वेळा पालीला गेलो परंतु वेळे अभावी हि माहिती पालीच्या विश्वस्त मंडळींना सांगायची रहिली...यावेळी मात्र तिथल्या विश्वस्त लोकांना हे सांगायचे असे ठरवून आले..तुम्हीही कधी गेलात तर नक्की बघा..आणि मला सांगा..:)
जसे सुगंधाचे आहे तसेच भक्तीचे देखील कारण सुगंध आणि भक्ती यांचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही. वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत सुगंधाचे आकाश...आणि त्याचप्रमाणे भक्ती हि मनाच्या अंतर्मनात पोहोचली कि तिचे खरे अस्तित्व.
लहानपणापासूनच गणपतीशी असलेली गप्पा मारण्याची सवय..त्यामुळे अगदी "सखा "म्हटले तरी हरकत नाही...एका निरागस गाण्यातल्या सहज दोन ओळी मनात आल्या :
   " हाती अमृताचा वसा; साथ देई माझा सखा..त्याच्या कृतार्थ डोळ्यात... झुले उंच माझा झोका...
     मीच ओलांडले मला; सोबतीस माझा सखा..येई कवेत आकाश...... झुले उंच माझा झोका..."
ब्लॉग लिहायला तर घेतला पण publish करण्याचा काही मुहूर्त लागत नव्हता...
शेवटी अधिक महिन्यात हा मुहूर्त मिळाला...
अधिकस्य अधिकं..असे मनात आले आणि पूर्णविराम दिला..


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा